
आरत्या, गाणी आणि गणरायाचा उत्सव: Ganesh Aarti and Ganapati Festival
सण गणपतीचा, सण आनंदाचा, सण आपुलकीचा आणि सण भक्तीचा.दरवर्षी प्रत्येक भक्त आपल्या गणरायाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो. जणू कोणी जिवलग नातेवाईकच घरी पाहुणा म्हणून येतो आहे, अशी प्रत्येकाची भावना असते. बाप्पा देव असला तरी तो हे दहा दिवस आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणूनच राहतो. आपल्या सोबत हसतो, खेळतो, सुख-दुःख वाटून घेतो, कुटुंबासमवेत पंगतीत बसून नैवेद्य खातो….