आरत्या, गाणी आणि गणरायाचा उत्सव: Ganesh Aarti and Ganapati Festival

Ganpati

सण गणपतीचा, सण आनंदाचा, सण आपुलकीचा आणि सण भक्तीचा.
दरवर्षी प्रत्येक भक्त आपल्या गणरायाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो. जणू कोणी जिवलग नातेवाईकच घरी पाहुणा म्हणून येतो आहे, अशी प्रत्येकाची भावना असते.

बाप्पा देव असला तरी तो हे दहा दिवस आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणूनच राहतो. आपल्या सोबत हसतो, खेळतो, सुख-दुःख वाटून घेतो, कुटुंबासमवेत पंगतीत बसून नैवेद्य खातो. बाप्पा घरी येतो तेव्हा तो एकटा येत नाही; तो सोबत घेऊन येतो आनंद, हर्ष, उत्साह आणि भरभराट.

घराघरांत होणाऱ्या त्या आरत्या, ती सुंदर सजावट, वेगवेगळी पक्वान्ने, आणि एकत्र जमलेले नातेवाईक हे सर्व एका वेळी अनुभवायला मिळते ते आपल्या बाप्पामुळेच.

पाहा, याही वर्षी बाप्पाचे आगमन झाले आहे. कानावर पुन्हा आरत्यांचे स्वर घुमतील कुठे ढोलांच्या तालावर, तर कुठे टाळ्यांच्या गजरात. कुणाचा कणखर आवाज, तर कुणाचे पुटपुटणारे ओठ.

चला तर मग, याही वर्षी बाप्पाचा सण जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरा करूया.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


चला मग गाऊया बाप्पा ची आरती

गणपती

गणपतीची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ओ स्वामी शंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ओ स्वामी शंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ओ स्वामी शंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ओ स्वामी शंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

पांडुरंगाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥
राई-रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव॥

दुर्गा आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

विठ्ठलाची आरती

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे…
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप, हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०१॥

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि…
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०२॥

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा…
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०३॥

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें…
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०४॥

संत ज्ञानेश्वर महाराज आरती

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा, कैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा
वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०१॥

लोपलें ज्ञान जगीं
हित नेणती कोणी, नेणती कोणी
अवतार पांडुरंग
नाम ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी ॥०२॥

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा, वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०३॥

कनकाचे ताट करीं
उभ्या गोपिका नारी
गोपिका नारी, नारद तुंबरही
साम गायन करी, गायन करी
आरती ज्ञानराजा ॥०४॥

प्रगट गृह्य बोले
विश्व ब्रह्मचि केलें
ब्रह्मचि केलें
रामाजनार्दनीं
चरणीं मस्तक ठेविलें
आरती ज्ञानराजा ॥०५॥

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा, वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०६॥

संत तुकाराम महाराज आरती

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||

राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||

तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहींन रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजींन ।
भावे ओवाळीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥

अच्युतम केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥

मी लहान असताना कुठे तरी ऐकलं होतं हे गाणं. इतकं सुंदर आणि सोप्प आहे कि पाठच झालं. कुणी लिहिलं ते माहीत नाही, पण खूपच छान लिहिलंय. मी लहानपणापासून आनंद घेतोय या गाण्याचा, आता तुम्ही सुद्धा तुमच्या आरती च्या शेवटी गा आणि जल्लोष करा.

बाप्पा आला रे आला
साऱ्या भक्तांना आनंद झाला..||२||

एक दोन तीन चार
बाप्पाच्या गळ्यात सोन्याचा हार..||२||

बाप्पा.. आला रे आला
साऱ्या भक्तांना आनंद झाला..||२||

पाच सहा सात आठ
बाप्पाला बसायला सोन्याचा पाट..||२||

बाप्पा.. आला रे आला
साऱ्या भक्तांना आनंद झाला..||२||

नऊ दहा अकरा बारा
बाप्पाला पंख्याने घाला वारा..||२||

बाप्पा.. आला रे आला
साऱ्या भक्तांना आनंद झाला..||२||

तेरा चौदा पंधरा सोळा
बाप्पाच्या गळ्यात मोत्यांच्या माळा..||२||

बाप्पा.. आला रे आला
साऱ्या भक्तांना आनंद झाला..||२||

सतरा अठरा एकोणीस वीस
बाप्पाच्या डोक्यावर मोराचे पीस..||२||

बाप्पा.. आला रे आला
साऱ्या भक्तांना आनंद झाला..||२||

पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर
आमच्या बाप्पाचा पहिला नंबर..||२||

बाप्पा.. आला रे आला
साऱ्या भक्तांना आनंद झाला..||२||

Explore a world of literary wonders at www.lovetoread.online & join our Facebook Page– where each visit promises a new adventure in the realm of captivating content.
Also Check : www.plzrecycle.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *